मुंबई – बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये शूटिंग संपल्यानंतर इमरान हाश्मी मुख्य बाजारपेठेत फिरत होता. त्यानंतर काही अज्ञातांनी त्याच्यावर दगडफेक केली. ज्यात इमरान जखमी झालाय. आता इम्रानने या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.
इमरान हाश्मीने ट्विट करून लिहिले,’काश्मीरच्या लोक मनापासून स्वागत करत आहे. श्रीनगर आणि पहलगाममध्ये खूप छान शूटिंग झाले. दगडफेकीच्या घटनेत मी जखमी झाल्याचे वृत्त खोटे आहे. इमरान हाश्मीच्या या ट्विटनंतर अभिनेत्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. इमरानचे चाहते आनंदी आहेत की त्याला कोणतीही दुखापत झाली नाही आणि तो पूर्णपणे बरा आहे.’
समोर आलेल्या वृत्तानुसार, इमरानने पहलगाममध्ये ग्राउंड झिरो या चित्रपटाचे शूटिंग करत होता. हा चित्रपट बीएसएफ जवानावर आधारित आहे. शूटिंग अगदी सहज आणि शांततेत पार पडलं. शूट संपल्यानंतर इमरान हाश्मी मेकर्ससोबत पहलगामच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचला. जिथे काही अज्ञात लोकांनी अभिनेता आणि बाकीच्यांवर दगडफेक केली. या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर १४७, १४८, ३७०, ३३६, ३२३ कलमे लावण्यात आली.
ग्राउंड झिरोमध्ये इमरान हाश्मीसोबत सई ताम्हणकर आणि झोया हुसैन काम करत आहेत. इमरान हाश्मीचे अनेक चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. टायगर 3 मध्ये तो सलमान खानसोबत दिसणार आहे, तर अक्षय कुमारसोबत सेल्फी या चित्रपटात तो दिसणार आहे. टायगर 3 मध्ये इमरान नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
इम्रान हाश्मीला पूर्वी सिरिल किसर या नावाने ओळखले जात होते. पण गेल्या काही वर्षांत इमरान हाश्मीने त्याच्या पात्रांमध्ये खूप बदल केले आहेत. प्रत्येक शैलीत काम करून तो स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले आहे. लोक इमरान हाश्मीची सीरियल किसर इमेज विसरत आहेत. आता चाहत्यांना इम्रानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांची प्रतीक्षा आहे.