नारायणगाव -उन्हाळी कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी बाजारभाव वाढण्याच्या आशेवर कांदा चाळीत साठवणूक करण्यावरच भर देत आहेत.
ओतूर (ता. जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात 12 हजार 624 कांदा पिशव्यांची आवक झाली असून उच्च प्रतीच्या नविन कांद्यास 135 रुपये प्रती दहा किलोला भाव मिळाला.
गोळा कांदे 110 ते 135 ,सुपर कांदे 120 ते 80, गोल्टा कांदा 50 ते 80, गोलटी व बदला 20 ते 60 असा प्रतिदहा किलोला बाजारभाव मिळाला. तसेच बटाटा 182 पिशवी आवक असून त्यास 50 ते 201 रुपये बाजारभाव मिळाला.