नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. ते अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपण नरेंद्र मोदींचे फॅन असल्याचे सांगितले त्याच सोबत भारतात येण्याची इच्छादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुढील वर्षी मस्क भारत दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहेत.
लोटे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी भारत भेटीची इच्छा व्यक्त केली. पुढच्या वर्षी भारत दौऱ्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी पंतप्रधानांचा फॅन असल्याचे सांगत एलॉन मस्क यांनी, “मी भारताच्या भविष्याबाबत खूप उत्सुक आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारताकडे अधिक शक्यता आहेत. पंतप्रधान मोदींना भारताच्या उज्जवल भविष्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. नवीन कंपन्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन, धोरण उदारमतवादी आहे. मोदीं भारतात नवीन कंपन्यांचे स्वागत खुल्या हातांनी करतात त्यामुळे मी त्यांचा फॅन आहे”. अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
#WATCH | Prime Minister Narendra Modi meets Tesla and SpaceX CEO Elon Musk, in New York. pic.twitter.com/SjN1mmmvfd
— ANI (@ANI) June 20, 2023
पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीची माहिती देताना मस्क म्हणाले की, पंतप्रधानांशी भेट चांगली होती. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा केली. पुढील वर्षी मी भारतात येण्याचा विचार करत आहे. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबाबत विचारल्यावर मस्क म्हणाले की, मोदींना त्यांच्या देशाची खूप काळजी आहे. म्हणूनच ते भारतात गुंतवणुकीसाठी खूप सक्रिय आहेत. आम्ही देखील भारतात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहोत. आम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. तसेच मोदींना ब्रॉडबँड इंटरनेट सेवा स्टारलिंक भारतात आणायची आहे. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहचण्यास मदत होणार आहे.
#WATCH | Twitter and SpaceX CEO Elon Musk after meeting PM Modi in New York, says “I am planning to visit India next year. I am confident that Tesla will be in India and we will do so as soon as humanly possible. I would like to thank PM Modi for his support and hopefully, we… pic.twitter.com/JhuPXsSPD1
— ANI (@ANI) June 21, 2023
एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की, भारताच्या भविष्याबद्दल मी खूप उत्सुक आहे.पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाबद्दल खूप प्रेम आणि काळजी आहे. म्हणूनच ते आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये मस्क यांच्या कॅलिफोर्निया या ठिकाणी असलेल्या टेस्ला मोटर्सच्या फॅक्टरीतही त्यांना भेटले होते. त्यावेळी मस्क हे ट्विटरचे सीईओ नव्हते. बुधवारी या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. टेस्ला मोटर्स ही कंपनी भारतात कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीने जागेच्या शोधात आहे. त्या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.