पुणे – इयत्ता अकरावीच्या तिसऱ्या नियमित प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात 12 हजार 461 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. यात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दाखविली आहे.
304 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 7 हजार 30 प्रवेशाच्या जागा आहेत. पहिल्या दोन नियमित फेऱ्यांमध्ये 41 हजार 38 जणांचे प्रवेश निश्चित झाले. तिसऱ्या फेरीची प्रक्रिया 10 डिसेंबरपासून सुरू झाली. यासाठी 51 हजार 107 प्रवेशाच्या जागा आहेत. त्यासाठी 33 हजार 661 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदविले होते.
यातील प्रवेश जाहीर झालेल्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. प्रवेश रद्द करणे, नाकारणे, पुढील प्रवेश फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठीची प्रक्रिया याच कालावधीत होणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी प्रवेशासाठी विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे.
पहिल्या पसंती क्रमानुसार 2 हजार 543 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. दुसऱ्या पसंती क्रमानुसार 2 हजार 773, तिसऱ्या पसंती क्रमांकानुसार 1 हजार 968, चौथ्या क्रमांकानुसार 1 हजार 407, पाचव्या क्रमांकानुसार 1 हजार 147 विद्यार्थ्यांना प्रवेश वाटप झाले आहे. खुल्या प्रवर्गासाठी 12 हजार 974 जागा होत्या. त्यासाठी 24 हजार 771 अर्ज आले. त्यातील 7 हजार 999 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले.
तिसरी नियमित प्रवेश फेरी
शाखा – प्रवेशासाठी उपलब्ध जागा – विद्यार्थ्यांचे अर्ज – प्रवेश जाहीर
कला – 8982 – 2772 – 1343
वाणिज्य – 20100 – 14818- 5303
विज्ञान – 19159-15641 – 5683
एचएसव्हीसी – 2856 – 430 – 132
एकुण – 51107 – 33661 – 12461