मार्क झुकरबर्ग भारतातील व्हॉटस्‌ऍप पेमेंट सर्व्हिसविषयी काय म्हणाले, वाचा-

नवी दिल्ली – फेसबुकचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी आज सांगितले की, एक उल्लेखनीय उद्योजकता संस्कृती लाभलेला भारत हा एक खास आणि महत्त्वाचा देश आहे. पेमेंट्‌स सेवांवर भारताकडून खास लक्ष पुरविण्यात येत असल्यामुळे भारतीय युजर्संना व्हॉट्‌सऍपवर पेमेंट सेवा वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

गेल्या महिन्यात नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडून फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्‌सऍपला भारतातील पेमेंट्‌स सेवा सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली. व्हॉट्‌सऍपने 2018 मध्ये, आपल्या यूपीआय-आधारित पेमेंट सेवांची चाचणी भारतात सुरू केली होती.

‘आम्ही मागील महिन्यात भारतात व्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेची चाचणी केली. त्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाला, मित्रमंडळींना व्हॉट्‌सऍप पेमेंट माधमातून सहज पैसे पाठवू शकता. कारण भारतातील यूपीआय पद्धतीमुळे हे सहज शक्‍य झाले आहे’, असे झुकरबर्ग म्हणाले.

एप्रिल महिन्यात जीओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपये गुंतवणार असल्याची घोषणा फेसबुकने केली असल्याचेही झुकरबर्ग यांनी रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याशी केलेल्या चॅटदरम्यान सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.