जळोची- बारामती येथील (दि.22) घेतलेल्या नमुन्यांपैकी एकूण 59 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 42 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. 17 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
प्राप्त झालेल्या 42 अहवालांपैकी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यामध्ये बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या गुरुकुल सोसायटी शिवनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा तसेच जामदार रोड कसबा येथील रुग्णाच्या संपर्कातील तीनजणांचा व मुक्ती अपार्टमेंट कसबा येथील एक जणांचा, खंडोबानगर दत्त मंदिराजवळ येथील दोन, मारवाड पेठ येथील एक व ख्रिश्चन कॉलनीतील एक, असे 11अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.