काठमांडू : शनिवारी पश्चिम नेपाळच्या डांग जिल्ह्यात वीज कोसळल्याने दोन मुलांसह तीन जण ठार झाले. तुलसिपूर महापालिकेच्या हद्दीत एका घरावर वीज पडली. त्यामध्ये लक्ष्मी चौधरी या महिलेसह 7 वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये या घराचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दुसऱ्या घटनेत याच जिल्ह्यातील घोराही नगरपालिकेत 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तो घराबाहेर खेळत असताना विजेचा जोरदार धक्का बसला, अशी माहिती पोलिसांनी दिली.