पुणे, दि. 2 -मुंबईत विजेवर धावणारी दुमजली वातानुकूलित बस आता पुणे शहरातही धावणार आहे. पुण्यातील ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरमध्ये (एआरएआय) या बसची चाचणी सुरू झाली आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या महिन्यात मुंबईत ही बस सेवेत दाखल होणार आहे.
प्रवासी वाहतुकीची अधिक क्षमता असलेल्या दुमजली वातानुकूलित बस टप्प्याटप्प्याने सेवेत आणण्याचा निर्णय मुंबई बेस्टने घेतल्यानंतर अशा 900 बस भाडेतत्त्वावर ताफ्यात समाविष्ट होतील. पुण्यातील एआरएआय सेंटरमध्ये विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बसच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईनंतर पुण्यातही याची चाचणी घेतली जावू शकते. दुमजली वातानुकूलित बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असून ते उघड किंवा बंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांसह बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्थाही आहे. या बसची 80 मिनिटांत चार्जिग’ पूर्ण होते. क्षमता 66 असून उभ्याने दहा जण प्रवास करू शकतात.