वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड; अजित पवारांनी केले अभिनंदन

मुंबई: विजय वडेट्टीवार यांची विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विधिमंडळ पक्षनेते आमदार अजित पवार यांनी अभिनंदन केले. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व विरोधी मित्रपक्षांची मागणी होती. आज आमची मागणी मान्य झाली, असे पवार म्हणाले.

वडेट्टीवार यांना २०-२० मॅच खेळायची आहे. त्यांना कामकाजासाठी सहाच दिवसाचा कालावधी मिळत आहे. पण सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी मोठी असते. त्यामुळे जनता विरोधी पक्षनेत्यांकडे अपेक्षेने पाहते, विरोधी पक्षनेता आक्रमक असायला हवा अशी जनतेची मागणी असते आणि विजय वडेट्टीवार जनतेची अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.