परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता पूर्ण  

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये परराष्ट्री मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेल्या एस जयशंकर यांनी आज नवी दिल्ली येथे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये औपचारिकरीत्या भाजप प्रवेश केला.  मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये सदर व्यक्ती लोकसभा अथवा राज्यसभेची सदस्य असावी अशी अट असून या अटींची पूर्तता करण्यासाठी भाजप एस शंकर यांना गुजरातमधून राज्यसभेवर घेणार असल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सक्षमपणे सांभाळणाऱ्या सुषमा स्वराज यांनी यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या जागी एस शंकर यांची वर्णी लागली होती. एस शंकर यांनी यापूर्वी भारत सरकारमध्ये परराष्ट्र सचिव म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.