पिंपरी (प्रतिनिधी) -राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनीही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणुकीच्या कामकाजाकरिता आयुक्तालयात लोकसभेप्रमाणे विधानसभेकरिताही शुक्रवारपासून (दि.30) कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
निवडणूक कक्षातील अधिकारी व कर्मचारी
पिंपरी- चिंचवड आयुक्तलयातील निवडणूक कक्षामध्ये उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक सायली चव्हाण, उपनिरीक्षक सागर पाटील, हवालदार पी. एम. जाधव, हवालदार एस. एन. बोटकर, हवालदार डी. व्ही. वनवे, हवालदार डी. एस. शेळकंदे, पिंपरी- चिंचवड आयुक्तलयातील निवडणूक कक्षामध्ये उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक सायली चव्हाण, उपनिरीक्षक सागर पाटील, हवालदार पी. एम. जाधव, हवालदार एस. एन. बोटकर, हवालदार डी. व्ही. वनवे, हवालदार डी. एस. शेळकंदे, पोलीस नाईक व्ही. आर. पांचाळ, पोलीस नाईक एस. व्ही. महामुनी, पोलीस नाईक जी. एन. जगताप, पोलीस नाईक एस. एन. काळे, पोलीस नाईक ओ. एम. गायकवाड, पोलीस नाईक के. एन. पालवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच लोकसभा निवडणुकीतील चोख नियोजनामुळे किरकोळ अपवाद वगळता कुठेही गैरप्रकार झाले नाहीत. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकांपूर्वी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विविध प्रकारचे अहवाल तयार केले जातात. यातील अनेक गोपनीय अहवाल निवडणूक कक्षामार्फत केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठवले जातात. गुन्हेगारांची रेकॉर्ड तयार करून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातात. त्या दृष्टीने पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून दिलेल्या सूचनांची पूर्तताही कक्षातर्फे केली जाते.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत प्रामुख्याने मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी हे मतदार संघ येतात. तर, खेड-आळंदी आणि भोर विधानसभेचाही काही भाग येतो. सर्व पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांनी हद्दीतील संवेदनशील भागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, संवेदनशील भाग आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे गोपनीय अहवाल तयार करण्याचे कामकाज सुरु आहे. सुरवातीला पाच अधिकारी आणि 10 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रशासनाच्या विविध विभागांशी निवडणूक कक्ष समन्वय साधून कामकाज पाहणार आहे.