मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपची ताकद पणाला लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ऋतुजा लटके या शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. रमेश लटके यांचे अकाली निधन झाल्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खरात) पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खरात) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आज माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची दुपारी 1 वाजता भेट घेऊन #अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महाविकासआघाडीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचा पाठिंबा दिला.#Maharashtra pic.twitter.com/lxZBpi3s3r
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) October 11, 2022
सचिन खरात यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे त्यांनी म्हटले आहे की, “आज (मंगळवार,दि. 11) माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची दुपारी 1 वाजता भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महाविकासआघाडी चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाने पाठिंबा दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खरात) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठिंबा दर्शवला. pic.twitter.com/G4aZIDqb6q
— Shivsena Communication (@ShivsenaComms) October 11, 2022
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने देखील यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष ( मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे) , जनता दल (से) प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी देखील पांठिबा दर्शविला आहे.
भाकपचे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठींबा जाहीर केला. pic.twitter.com/DWZCcbONpn
— Shivsena Communication (@ShivsenaComms) October 12, 2022
अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहेत.