जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील मुदत संपलेल्या, नव्याने स्थापित, आयोगाने निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या 3 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी हरकती व सूचना 4 मार्च 2022 पर्यंत तहसील कार्यालय येथे दाखल कराव्यात. असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित, निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत दि. 2019 मध्ये दिलेला कार्यक्रम चुकीच्या पध्दतीने राबविल्यामुळे सर्व निवडणुक कार्यक्रम रद केलेल्या जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागाच्या रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शिउर,राजुरी,रत्नापुर, या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सदर प्रारूप प्रभाग रचना तहसील, पंचायत समिती, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. तेव्हा या ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी 4 मार्च 2022 पर्यंत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.