मुंबई – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातल्या एकवीरादेवी मंदिरातला यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मंदिरही भाविकांच्या दर्शनासाठी बंद असल्याने हा चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याचे मंदिर संस्थानच्यावतीने आज जाहिर करण्यात आले. धुळे शहरातून 8 एप्रिल रोजी एकविरा देवीची पालखीसुद्धा निघणार नाही. कुळाचार वगैरे विधीही घरीच करण्याचे आवाहन मंदिराच्यावतीने करण्यात आलं आहे.
कोल्हापूरच्या ज्योतिबाची चैत्र यात्राही यावर्षी रद्द करण्यात आली आहे. ही परंपरा तब्बल 121 वर्षानंतर प्रथमच खंडित झाली आहे. याआधी 1899 मध्ये प्लेगच्या साथीमुळे छत्रपती शाहू महाराजांनी ही यात्रा रद्द केली होती.