जोहान्सबर्ग :- दक्षिण आफ्रिकेचा सलामावीर फलंदाज व यष्टीरक्षक क्वांटन डिकॉक याने आपण एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
अर्थात ही निवृत्ती केवळ एकदिवसीय सामन्यांतूनच घेणार असून टी-20 क्रिकेट व आयपीएलसह जगभरातील टी-20 लीग खेळतच राहणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.
क्विटन डी कॉकने आतापर्यंत 140 एकदिवसीय, 54 कसोटी आणि 80 टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.डिकॉक आत्ता केवळ 30 वर्षांचा असून त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 140 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 17 शतके व 29 अर्धशतकांसह 5 हजार 966 धावा केल्या आहेत.
विश्वकरंडक दक्षिण आफ्रिकेचा संघ :-
टेम्बा बावुमा (C), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक(Wk), रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा, तबरेझ शाम्सी, रस्सी व्हॅन डेर डूसन.
दरम्यान,एकदिवसीय विश्वकंरडक 2023 स्पर्धेचे यजमानपद भारत भूषणावर आहे. या स्पर्धेतील पहिला सामना येत्या 5 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. तर, अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होईल. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.