एकनाथ खडसेंनी मोदींवरील टीकेचे ट्विट केले रिट्विट; परंतु…

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चेने काही दिवसांपासून जोर धरला आहे. लवकरच ते सीमोल्लंघन करणार असल्याचेही म्हंटले जात आहे. अशातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ट्वीट केले. हे रिट्वीट करून एकनाथ खडसे यांनी एकच खळबळ उडवून दिली. पण, तासाभरातच त्यांनी माघारही घेतली.

पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करत करोनाची परिस्थिती अजून टळली नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले. यावर जयंत पाटील म्हणाले कि, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असे वाटले होते. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, अशी टीका त्यांनी केली. 

जयंत पाटील यांचे ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. परंतु, आपल्या प्रवेशाचे संकेत देणाऱ्या एकनाथ खडसे यांनी तासाभरातच माघार घेत ट्विट डिलीट केले. 

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले,  नाराज होणे, पुन्हा नॉर्मल होणे’ ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. व्यक्ती नॉर्मल झाल्यावर पुन्हा नाराज होणार नाही, असे कधीच नसतं. त्यामुळे भाजपचे नेते एकनाथ खडसे आता जरी नाराज असले तरी त्यांच्याबरोबर बोलणं सुरु आहे. त्यांची नाराजी दूर होईल. ते कुठेही जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.