fbpx

भारताच्या महिला बुद्धिबळ संघाची विजयाची हॅट्ट्रिक

चेन्नई -भारताच्या पुरुष संघाप्रमाणेच महिला संघानेही आशियाई नेशन्स ऑनलाईन बुद्दिबळ स्पर्धेत सलग तीन विजय प्राप्त करत हॅट्ट्रिक साधली. या स्पर्धेत आता भारताच्या महिला संघाचा सामना कझाकिस्तानशी होणार आहे. महिला संघाने या सलग तीन विजयांसह स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात फिलिपिन्सचा 3-1 असा पराभव केला. त्यानंतरच्या फेरीत कझाकिस्तानवर 2.5-1.5 अशी मात केली. तर नंतर व्हिएतनामचा 2.5-1.5 असा पराभव केला. या तीनही विजयांत महत्त्वाचा वाटा आर. वैशाली व पी. वी. नंदिथाचा होता. तिने फिलिपिन्स व कझाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत वर्चस्व राखल्यामुळेच भारताची सरशी झाली.

मात्र कझाकिस्तानविरुद्ध भक्ती कुलकर्णीचा डाव बरोबरीत संपला. व्हिएतनामविरुद्धच्या लढतीत वैशाली व गोम्स यांना विजय मिळवता आले. भारताकडून नवव्या फेरीअखेर वैशालीनेच आपली गुणवत्ता सिद्ध करताना सर्वाधिक 6.5 गुण प्राप्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.