ड्रग्ज बाळल्याप्रकरणी ‘एजाज खान’ला झाली अटक

मुंबई  -अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अभिनेता एजाज खान याला “नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरो’ने अटक केली आहे. यापूर्वी “एनसीबी’ने शादाब बटाटा या तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीदरम्यान एजाज खान याचे नाव पुढे आले होते. 

त्यामुळे “एनसीबी’ने एजाज खान याला ताब्यात घेतले आहे. एजाज राजस्थानमध्ये होता. मात्र तो मुंबईत आल्यावर “एनसीबी’ने त्याला विमानतळावरच ताब्यात घेतले. आज संध्याकाळी “एनसीबी’ने अंधेरी आणि लोखंडवाला कॉम्प्लेक्‍समधील एजाजच्या घरांवर छापे घातले.

एजाज खान याला “एनसीबी’ने ताब्यात घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी त्याला अटक केली गेली होती. त्यापूर्वी 2018 मध्ये अमली पदार्थांच्याच प्रकरणात मुंबईतल्या बदलापूर परिसरातील हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले गेले होते. त्यावेळी त्याच्याकडे 2.2 लाख किंमतीच्या एक्‍स्टसी नावाच्या 8 अमली गोळ्या सापडल्या होत्या.

मात्र आपण केवळ झोमॅटो कंपनीच्या डिलीव्हरी बॉयची मदत केली होती, असे ट्‌विट एजाजने केले होते.
“बिग बॉस-7’मध्ये सहभागी झाल्याने एजाज प्रसिद्ध झाला आहे. याशिवाय “बुढ्ढा होग तेरा बाप’,”सिंघम रिटर्न्स’, “अल्लाह के बंदे’ आणि अन्य काही सिनेमांमधूनही त्याने काम केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.