नवी दिल्ली -इंधनाच्या दरात या आठवड्यात तिसऱ्यांदा किंचीत घट झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात प्रति लीटर 22 पैसे ते डिझेल मध्ये प्रतिलिटर 23 पैसे इतकी घट झाली आहे.
या नवीन दरांनुसार दिल्लीत पेट्रोलचा दर आता 90 रूपये 56 पैसे तर डिझेलचा दर 80 रुपये 87 पैसे इतका झाला आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 96 रुपये 98 पैसे इतका झाला असून डिझेलचा दर 87 रुपये 96 पैसे इतका झाला आहे.
देशात गेले सहा महिने सतत इंधनाचे दर वाढत असून मार्च मध्ये प्रथमच इंधनाचे दर घटताना दिसत आहेत. सध्या पाच राज्यांत निवडणुका आहेत. निवडणुकांच्या काळात इंधनाचे दर वाढवायचे नाहींत असेच धोरण केंद्र सरकारने आत्तापर्यंत बाळगले आहे.
परंतु कच्चा तेलाच्या किंमतीत घट होऊ लागल्याने त्याचा इफेक्ट ग्राहकांना देण्यासाठी हे घटलेले दर मात्र या काळात लागू केले जात आहेत, असे तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.