पोलिसांच्या ‘त्या’ मोहिमेला मोठं यश; आठ नक्षलवाद्यांची शरणागती

दंतेवाडा – छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी आठ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी एक मोहीम चालवली असून त्यांच्या या मोहिमेला चांगले यश मिळत आहे.

आत्तापर्यंत या मोहीमेत 248 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 67 नक्षलवाद्यांना पकडून देण्यासाठी पोलिसांनी काही दिवसांपुर्वी मोठे बक्षिसही जाहीर केले होते.

आज शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक महिलेचाही समावेश आहे. त्यांनी सांगितले की पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्याविषयी आमच्याच काही माजी सहकाऱ्यांनी आमचे मन वळवले त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. आज शरण आलेल्यांमध्ये सुरेश ओयामी या कट्टर नक्षलवाद्याचाही समावेश असून त्याला पकडून देण्यासाठी 2 लाखांचे बक्षिस लावण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.