मुंबई – अमेरिकेमधील व्याजदर वाढ आणि रशिया -युक्रेन युद्धामुळे भारतीय रुपयाचे मूल्य घसरले आहे. ते सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅंक डॉलरची विक्री करीत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
जून महिन्यामध्ये रिझर्व्ह बॅंकेने जवळजवळ चार अब्ज डॉलरची विक्री केली असल्याचे दिसून येते. रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला वेळोवेळी अशा प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात.
मात्र भारताकडे परकीय चलनाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा नजीकच्या काळात नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. भारताकडे एक वर्ष पुरेल एवढा परकीय चलनाचा साठा असल्याचे समजले जाते.