व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीचा वापर घरातूनच
बेल्हे- करोनामुळे लॉकडाऊन केल्यामुळे सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्र देखील याला अपवाद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बेल्हे (ता. जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल या सीबीएसई मान्यताप्राप्त शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्याचे काम हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांना विविध विषयांचे शिक्षण ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे दिले जात आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देखील विद्यार्थी, शिक्षक घरी थांबून देखील ज्ञानदान व ज्ञानार्जनाचा हेतू साध्य करताना दिसत आहेत.
लॉकडाऊनमुळे शाळा व महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. विद्यार्थ्यांना खूप मोठा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर मात करीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावकार गुंजाळ, संचालक मंडळ, प्राचार्य विद्या गाडगे, सर्व शिक्षक यांनी परिस्थितीवर हा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी राबवलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेमुळे दहावी व नववीच्या मुलांना घर बसल्या सर्व लेक्चर आणि त्यांचे प्रॉब्लेम्स सोडवण्याचे ज्ञान मिळत आहे.
सीबीएसईचा अभ्यासक्रम मोठा असल्याने तो लॉकडाऊनमुळे मागे राहून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत विविध विषयांचे ऑनलाइन लेक्चर आयोजित केले जातात. सर्व शिक्षकांनी पुढील तीस दिवसांच्या अभ्यासाचे लिखित नियोजन केले आहे. एप्रिलमध्ये झूम मीटिंग ऑनलाइनच्या माध्यमातून ऑनलाइन विद्यार्थ्यांना शिकवले जाते. व्हिडिओ आणि ऑडिओद्वारे शिकवण्यासाठी शिक्षकांनी पालकांचे व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून या ग्रुपवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास दिला जात आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे पाठवले जातात. त्यानुसार विद्यार्थ्यांना होम वर्क दिला जात आहे.