बेकारीमुळे 5 वर्षांनी आयुष्य कमी होते
हाम्बुर्ग, दि. 11 – युरोपमध्ये दीड कोटी बेकार असून त्यांचे आयुष्य 5-5 वर्षे कमी होण्याचा धोका आहे, असे मानसशास्त्रज्ञ व मजूरविधेयक सल्लागार यांचे मत आहे. या बेकारांच्या मनावर इतका ताण पडतो, की त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात, त्यांचे मद्यपानाचे प्रमाण वाढते, एवढेच नव्हे तर त्यांचे लैगिक स्वारस्यही कमी होऊ लागते, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बेकारांची त्यांनी पाहणी केली, त्यावेळी असे दिसून आले की कामावरून काढून टाकण्यात आलेल्या एकाने आपण बेकार असल्याचे पत्नीलासुद्धा सांगितले नाही. तो रोज सकाळी नोकरीवर जातो म्हणून सांगून जाई. दिवसभर कोठेतरी गल्लीबोळात वेळ काढी व संध्याकाळी कर्मचारी परतण्याच्या वेळेला बसच्या रांगेत उभा राही!
अन्नटंचाई आहे ना? मग किडे खा!
नवी दिल्ली – व्हिक्टर बी. मेयर-रॉचोव्ह या जर्मन प्राणिशास्त्रज्ञाने अशी सूचना केली आहे की अन्नटंचाईचा, प्रथिनांच्या कमतरतेचा प्रश्न सोडविण्यासाठी किड्यांचाच अन्न म्हणून वापर करावा!
“ऑस्ट्रेलियन सायन्स मॅगेझीन’मधील एका लेखात हा तज्ज्ञ म्हणतो की, “किडे खाण्यात लाज वाटण्याचे कारण नाही. एके काळी जगभर लोक किडे खात होते! आजही अनेक जमातीत किडे खातातच.’