कोळश्यापासून तेल तयार करणार : दशवार्षिक योजना
नवी दिल्ली, दि. 7 – कोळश्यापासून तेल तयार करण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना “कोल इंडिया लिमिटेड’ने तयार केली असल्याचे समजते. ही योजना 400 कोटी रुपयांची, 10 वर्षांची असून ती केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला सादर करण्यात आली आहे. 10 वर्षांत 3355 कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे.
आज हवाई दल दिन
नवी दिल्ली – भारतीय हवाई दल आपला 44 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. आतापर्यंत 1 एप्रिल रोजी हा दिन साजरा केला जात असे. मात्र, या वर्षी प्रथमच ऑक्टोबरमध्ये हवाई दल दिन साजरा होत आहे.
हिंदी साहित्यात चिरंतन मूल्यांचा उद्घोष हवा
पुणे – “हिंदी साहित्यात चिरंतन मूल्यांचा उद्घोष व्हायला हवा’ असे आवाहन आंध्रचे माजी मुख्यमंत्री पी. जी. नरसिंह राव यांनी आज येथे भरलेल्या हिंदी लेखक संमेलनात बोलताना केले. उद्घाटनाच्या भाषणात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार म्हणाले, की भारतात विचार भावना यांचे एकत्रिकरण करावयाचे असेल तर या भूमीतच रुजलेली भाषा हवी व ती केवळ हिंदीच असू शकते.
सलाल प्रकरणी इस्लामाबादेत वाटाघाटी
नवी दिल्ली – सलाल जलविद्युत प्रकल्पासंबंधी भारत व पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र सचिव पातळीवर चालू असलेल्या वाटाघाटी आज संपल्या.