-ह. भ. प. नारायण म. शास्त्री
असोनि संसारी जिव्हे वेगु करी। वेदशास्त्र उभारी बाह्या सदा।।
संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पहिल्या अभंगातील तिसऱ्या चरणात पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात जो अधिकारी सांगितलेला आहे त्याचे स्पष्टीकरण करतात. तसेच आपण जे सांगितलेले आहे त्याला आधार देतात.
देह-स्त्रीपुत्रग्रहरूपी संसारात राहूनही जिभेला हरिनामाचे प्रखर व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्र हात वर करून सारखे सांगत आहेत. वरील चरणामध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हरिपाठ हे ईश्वरप्राप्तीचे असे साधन आहे.
ज्यासाठी माणसाला घरदार सोडण्याची काहीही आवश्यकता नाही. मनुष्य संसारात राहून देखील ईशप्राप्ती करून घेऊ शकतो. ज्ञानोबाराय असेही म्हणतात की, हे सर्व मी माझ्या पदरचे सांगत नाही.
सर्वांना प्रमाण असणारा वेद देखील वर हात करून असेच सांगतो... “वेदशास्त्र उभारी बाह्या सदा’