ज्ञानदीप लावू जगी | यज्ञ-दान-तप

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

आणि स्वधर्माचा आगिठां । देह जाड्याचिया किटा । आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे ।।

अर्जुना, देहाभिमानरूपी कीट नाहींसे करण्याकरिता त्याला स्वधर्मरूप अग्नीत जो वेदाध्ययनरूपी पुटें देतो, प्राणिमात्राचे ठिकाणी एकच आत्मा आहे असे समजून त्यांस नमस्कार करतो, परोपकार करण्याविषयी जो तत्पर असतो आणि स्त्रीसंबंधी तर त्याचा असा नियम झालेला असतो की, तिथे नावही घ्यावयाचे नाही !

जन्माच्या वेळेस स्त्रीचा (आईचा) स्पर्श झाला आहे, तो पुन्हा न व्हावा म्हणून जो आपले शरीरास स्त्रीसंबंध बिलकुल होऊ न देता जन्मभर पवित्र ठेवतो, गवतासही जीव आहे असे समजून जो ते तुडवीत नाही, जो कोणालाही वर्मी लागेल असे बोलत नाही;

अशा प्रकारे शरीराने व्यापार करण्याची ज्या वेळेस सवय होते, त्या वेळेस त्याच्या अंगात शारीर तप पूर्णपणे ठसले आहे. पार्था, या सर्व गोष्टी देहाच्या अनुरोधाने घडून येतात, तेव्हा त्यास शारीर तप असे म्हणतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.