49 वर्षांपूर्वी प्रभात : खडीसाखरेची जकात

ता. 4, माहे मे, सन 1972

मुंबई-पुणे दूरचित्रवाणी 36500 चौरस कि.मी. क्षेत्रात कार्यक्रम पाहता येतील!

नवी दिल्ली, दि. 3 -मुंबईचे दूरचित्रवाणी केंद्र व त्यांच्याशी संलग्न असलेले पुणे सहक्षेपण यांचे कार्यक्रम 36500 चौरस किलोमीटर भागात पाहता येईल.
माहिती व नभोवाणी खात्याच्या राज्यमंत्री श्रीमती नंदिनी सत्पथी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. मुंबई केंद्र येत्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कलकत्ता येथील दूरचित्रवाणी केंद्र मार्च 1974 च्या सुमारास होईल व त्याचे कार्यक्रम 18000 चौरस किलोमीटर भागात पाहता येतील, असेही त्यांनी सांगितले.

समाजवादी पक्षाचे 30 उमेदवार

पुणे –पुणे जिल्हा समाजवादी पक्षातर्फे जिल्हा परिषदेच्या 30 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यांत आला. जिल्हाध्यक्ष श्री. रामभाऊ तुपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यांत आला.

30 जागांपैकी 22 मतदारसंघाची यादी पूर्ण झाली असून, त्यात शिरूर 5, हवेली, इंदापूर, बारामती, जुन्नर प्रत्येकी 3, पुरंदर, खेड प्रत्येकी 2 व मुळशी, माळव, भोर येथे एकेक जागा लढविली जाईल. निर्णय घेतलेल्या उमेदवारात गणपत आवटे, रामचंद्र निंबाळकर, दत्तोबा ढमढेरे, रायकुमार गुजर, माधवराव फराटे, व्यंकटराव गरूड, माधव दांगट, दत्ता पासलकर, दत्ता घारग, बाळासाहेब मुळीक इ. प्रमुख कार्यकर्त्यांची नावे जाहीर झाली आहेत.

खडीसाखरेची जकात

नवी दिल्ली –व्हॅक्‍यूम पॅन फॅक्‍टरीत तयार होणाऱ्या खडीसाखरेची जकात किंमत दर क्विंटलला रु. 190 ऐवजी 200 रु. करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.