Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अबाऊट टर्न : हुबेहूब

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2021 | 5:00 am
A A

-हिमांशू

एखाद्या मृतावर अंत्यसंस्कार करून मंडळी घरी परतली आणि ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तोच माणूस समोर उभा ठाकला, असे काही किस्से आपण ऐकले आहेत. काही ठिकाणी तर मृताला चितेवर ठेवल्याक्षणी तो उठून बसल्याच्याही घटना घडल्या आहेत. करोनाच्या काळात शवागारातून मृतदेह गायब झाल्याच्या घटना ऐकायला मिळाल्या. करोनाच्या काळातला मृत्यूच मुळात खूप भयावह! 

आप्तसोयरे पोहोचवायलाही जाऊ शकत नाहीत, अशी अवस्था. मोठ्या संख्येने मृत्यू होत असताना दोन मृतदेहांची अदलाबदल होणं किंवा एखादा मृतदेह शवागारातून गायब होणं हा काही फार मोठा चमत्कार म्हणता येणार नाही. परंतु मृत व्यक्‍ती जिवंत होण्याच्या घटनेकडे आजमितीस तरी चमत्कार म्हणूनच पाहिलं जातं. अर्थात, अनेकदा संबंधित व्यक्‍ती मृत्यू पावलीच नव्हती हे पुढे येतं. परंतु अशी मृत व्यक्‍ती अचानक समोर उभी राहणं हा मोठा धक्‍का असतो.

अर्थात, काही वेळा असे चमत्कार “गृहित’ धरले जात असावेत. त्यामुळे अचानक घाबरगुंडी आणि पळापळ होत नाही. आता हेच पाहा ना, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एक 62 वर्षांचे गृहस्थ मतदानासाठी आले. त्यांच्या बरोबर आणखीही दोन महिला होत्या. या तिघांकडे मतदान ओळखपत्र होतं. परंतु गावपातळीवर उमेदवार मतदारांना व्यक्‍तिशः ओळखणारे असतात. त्यामुळे एका उमेदवाराला या तिघांविषयी संशय आल्यावर त्यांनी आक्षेप घेतला.

हे तीनही मतदार बोगस असल्याचा संशय आल्यावर त्यातील 62 वर्षांचे गृहस्थ कुणाच्या नावावर मतदान करायला आलेत याची तपासणी झाली. संबंधितानं मृत व्यक्‍तीचं नाव सांगितल्यावर संशय आणखी बळावला. बूथवरच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली आणि या तिघांना ताब्यात घेतलं. अर्थात, ही झाली लक्षात आलेली घटना. विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक बूथवर मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्‍ती सगळ्यांच्या ओळखीच्या नसतात. बूथवरच्या कर्मचारी तर कुणालाच ओळखत नसतात. त्यामुळे आता मतदारांचे फोटोही मतदारयादीवर असतात. तरीसुद्धा “मृत व्यक्‍ती’ मतदानासाठी येतात हा मात्र चमत्कारच मानायला हवा. कितीतरी “मृत व्यक्‍ती’ विनासायास मतदान करून निघून जातात. परंतु सर्वांत मोठा चमत्कार म्हणजे अशा व्यक्‍तींकडे आढळणारी मतदार ओळखपत्रं. हुबेहूब खऱ्यासारखी ओळखपत्रं बनवतं कोण, हा संशोधनाचाच विषय आहे. या कलावंतांचा शोध घेतलाच पाहिजे. ही कला साधीसोपी नाही. खऱ्या ओळखपत्रावरचे फोटोसुद्धा खोटे वाटतात

अनेकदा! मतदार ओळखपत्र मिळालं म्हणून माणूस क्षणभर खूश होतो; पण त्याचाच फोटो त्यालाच ओळखू येत नाही, तेव्हा त्याचा उत्साह मावळतो. कित्येकांना आपल्या फोटोची तुलना एसटी स्टॅंडवरच्या गुन्हेगारांच्या फोटोशी करावीशी वाटते. पण बोगस मतदारांचे फोटो अगदी परफेक्‍ट येतात!
आपल्या निवडणूक प्रक्रियेत कधीकधी अशी सौंदर्यस्थळं दिसून येतात, की आपण थक्‍क होतो. आता हेच पाहा ना, जिवंत व्यक्‍तींनी मतदान करावं यासाठी सरकारला पैसे खर्च करून प्रबोधन करावं लागतं.

कितीतरी माध्यमांतून “मतदान हा हक्‍क आणि कर्तव्यसुद्धा आहे,’ असं कानीकपाळी ओरडून सांगावं लागतं. तरीसुद्धा अनेक जिवंत लोक मतदानाला जात नाहीत. त्याऐवजी पिकनिकला जातात. परंतु मृत व्यक्‍ती मात्र न बोलावता, न विसरता मतदानाला येतात. मतदानाचं महत्त्व इतक्‍या उशिरा कळतं?

Tags: about turneditorial page article
Previous Post

इंडियन यंगस्टर्स स्पिरीट

Next Post

62 वर्षांपूर्वी प्रभात : सीमा लढा तीव्र का झाला?

शिफारस केलेल्या बातम्या

विशेष : आधुनिक भगीरथ
संपादकीय

विशेष : आधुनिक भगीरथ

1 week ago
अबाऊट टर्न : प्रतिभेला कवच
संपादकीय

अबाऊट टर्न : प्रतिभेला कवच

1 week ago
अबाऊट टर्न: भंगारजीवी
संपादकीय

अबाऊट टर्न: भंगारजीवी

1 month ago
अबाऊट टर्न : भविष्य वितळतंय!
संपादकीय

अबाऊट टर्न : भविष्य वितळतंय!

3 months ago
Next Post
62 वर्षांपूर्वी प्रभात : गंगापूर धरणाचे काम संपत आले

62 वर्षांपूर्वी प्रभात : सीमा लढा तीव्र का झाला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

“…तर गालावर वळ उठतील हे निश्चित”; मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांचा इशारा

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई; शरद पवार म्हणाले…

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: about turneditorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही