ED Raids Amanatullah Khan Place : दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) नेते सध्या अंमलबजावणी संचालनालयाची म्हणजेच ईडीची करडी नजर असल्याचे दिसून येत आहे.कारण आता पुन्हा एकदा आपच्या नेत्यावर ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने आम आदमी पक्षाचे नेते अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांच्या घरावर छापा टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांच्या आधारे अमानत उला खान (Amanatullah Khan) यांच्यावर ईडीने हा छापा टाकला आहे. गेल्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिल्लीतील अमानतशी संबंधित 5 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात 12 लाख रुपये रोख, 1 विनापरवाना बेरेटा पिस्तूल आणि 2 वेगवेगळ्या बोअरची काडतुसे जप्त करण्यात आली.
गेल्या वर्षी एसीबीने अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांना अटक केली होती आणि नंतर त्यांना जामीनही मिळाला होता. गेल्या वर्षी वक्फ बोर्ड प्रकरणात एसीबीच्या छाप्यादरम्यान आप आमदाराच्या जवळच्या ठिकाणांवरून सापडलेल्या डायरींबाबत ईडीचा हा छापा सुरू आहे. दिल्ली वक्फ बोर्डाच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी सीबीआय आणि एसीबीने स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
अमानतुल्ला खानला (Amanatullah Khan) गेल्या वर्षी एसीबीने अटक केली होती. झडतीदरम्यान काही डायरी जप्त करण्यात आल्या. अमानतुल्ला खान यांच्या निकटवर्तीयाकडून या डायऱ्या सापडल्या होत्या. ज्यामध्ये हवाला व्यवहाराचे प्रकरण समोर आले. परदेशातूनही काही व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. एसीबीने त्याचा तपास ईडीकडे शेअर केला होता.