मुंबई – महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय पेच प्रसंगात शिवसेनेच्यावतीने एकाकी किल्ला लढवणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीची नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यावर तितकीच तिखट प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की आम्ही महाराष्ट्रात मोठी लढाई लढतो आहोत आम्हाला थांबवण्यासाठी पुन्हा हे कटकारस्थान रचले गेले आहे.
तथापि माझा शिरच्छेद जरी करण्यात आला तरी मी गुवाहाटीचा मार्ग पत्करणार नाही. या आणि मला अटक करा असे जाहींर आव्हानही त्यांनी ट्विटरदारे दिले आहे. त्यांनी हा देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे. पत्रा चाळ व्यवहाराच्या संबंधात ईडीकडून त्यांची चौकशी केली जात असून संजय राऊत यांच्याही विरोधात मनि लॉड्रिंगची केस दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सध्याच्या शिवसेनेपुढील संकटात राऊत हे जोरदारपणे पक्षाची बाजी लावून धरीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर ही नोटीस जारी केली गेली आहे. ईडीने संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची सुमारे 11 कोटी 15 लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे.