Ecuador Gunmen : इक्वाडोरमधील एक धक्कादायक घटना घडली आहे. तेरा बंदुकधाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयात घुसून थेट प्रक्षेपण सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला केला. इक्वाडोरच्या ग्वायाकिल शहरात असलेल्या टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या कार्यालयात मंगळवारी हा प्रकार घडला. इतकेच काय तर स्टुडिओ बॉम्बने उडवून देण्याची देखील धमकी देण्यात आली.
13 दहशतवादी तोंडांवर काळा कपडा बांधून हातात बंदूक आणि स्फोटकांसह टीव्ही स्टुडिओमध्ये घुसले आणि धमकावण्यास सुरुवात केली. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा सर्व प्रकार लाईव्ह टीव्हीवर सुरु होता. साधारण 15 मिनिटे या संपूर्ण घटनेचे थेट प्रक्षेपण सुरु होतं. यावेळी स्टुडिओमध्ये गोळीबार देखील करण्यात आला.
JUST IN: The 13 thugs who took hostages on a live television broadcast in Ecuador have been arrested and will reportedly be charged with terrorism.
Here are the 13 clowns celebrating and flashing their gang signs for the cameras just moments before being arrested.
Life comes… pic.twitter.com/PR9GChrfTe
— Collin Rugg (@CollinRugg) January 10, 2024
टीसी टेलिव्हिजनच्या प्रमुख काय म्हणाल्या?
टीसी टेलिव्हिजनच्या प्रमुख ॲलिना मॅनरिक यांनी सांगितले की, जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा त्या नियंत्रण कक्षात बसल्या होत्या. हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्या कपाळावर बंदूक रोखून त्यांना जमिनीवर बसण्यास सांगितले. या दहशतीचे जवळपास १५ मिनिटे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर वृत्तवाहिनीचे सिग्नल बंद करण्यात आल्यामुळे प्रक्षेपण थांबले.
इक्वाडोरमध्ये अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. ड्रग माफिया जोस अडोल्फो मॅकियास उर्फ फिटो इक्वेडोरमधील तुरुंगातून फरार झाला आहे. सशस्त्र टोळ्यांचा हिंसाचार वाढल्यानंतर राष्ट्राध्यक्ष नोबोआ यांनी आणीबाणीसदृश्य परिस्थिती घोषित केली. त्यानंतर वृत्तवाहिनीवर हल्ला झाला. याशिवाय देशात कार्यरत असलेल्या 20 अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना दहशतवादी गट म्हणून घोषित करण्यात यावं, असा आदेश जारी करण्यात आला होता. त्यानंतर आता येथे एकच खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळाले.