Eclipse 2024 – येत्या वर्षात म्हणजे वर्ष 2024 मध्ये पाच ग्रहणे होणार आहेत. पहिले ग्रहण चंद्रग्रहण असेल आणि दुसरे ग्रहण सूर्यग्रहण असेल. या वर्षी खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. ज्यावेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते.
2024 मध्ये सोमवार, 8 एप्रिल रोजी सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण प्रामुख्याने कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्समध्ये दिसेल. याशिवाय स्पेन, युनायटेड किंगडम, रशिया, नॉर्वे, आइसलॅंड, आयर्लंड आणि फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये ते अंशतः पाहिले जाऊ शकते.
भारतासाठी 2024 मधील पहिले ग्रहण चंद्रग्रहण असेल जे 25 मार्च रोजी होणार आहे. यानंतर 8 एप्रिलला सूर्यग्रहण दिसणार असून त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दिसणार आहे.
खंडग्रास सूर्यग्रहण पाच टप्प्यात होते. सर्वप्रथम, एक आंशिक सूर्यग्रहण होते ज्यामध्ये चंद्र सूर्याला झाकण्यास सुरवात करतो आणि चंद्राची सावली सूर्यावर दिसू लागते. दुसऱ्या टप्प्यात खंडग्रास सूर्यग्रहण सुरू होते.
यामध्ये चंद्राचा गडद भाग दिसतो आणि हिऱ्याच्या अंगठीसारखा प्रभाव दिसतो. तिसरा टप्पा आहे ज्यामध्ये पूर्ण सूर्यग्रहण होते. यामध्ये ग्रहण शिखरावर असते. आकाश काळवंडते आणि तापमान कमी होऊ लागते. यानंतर चंद्र फिरू लागतो आणि सूर्य पुन्हा दिसू लागतो.
अखेरीस आंशिक ग्रहण दृश्यमान होते आणि चंद्र सूर्यापासून दूर जात असल्याचे दिसते. यामुळे ग्रहण संपते. ग्रहणकाळात डोळे झाकणे आणि सुरक्षा उपकरणे घालणे चांगले. ग्रहणकाळात सूर्यकिरणांमुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.