१. हाडांच्या आरोग्य सुधारणा:
खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर यासाठी खजूर हा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते.
२. त्वचा उजळते:
खजूर खल्ल्याने त्वचा चांगली राहते. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात. शिवाय, आपल्या आहारात खारका असतील तर कोणत्याही त्वचाची समस्या जाणवत नाही.
३. वजन वाढविण्यास मदत:
वजन वाढत नसेल तर खजूर खा. यामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन (प्रथिने) जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते. बारीक असणाऱ्या व्यक्तींनी रोज 4ते 5 खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढेल.
४. पचन प्रकिया चांगली राहते:
रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्यास ते आरोग्यासाठी चांगले असते. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.
५. मज्जासंस्था मजबूत:
खजूर तसेच खारका आपल्या मज्जासंस्था मजबूत ठेवण्यात मदत करतात. जीवनसत्त्वांमुळे मानवी मज्जासंस्थाचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते. पोटॅशियममुळे मेंदूची गती व दक्षता वाढवण्यासाठी मदत होते. खजूर खल्ल्याने हृदय आणि रक्तदाब पातळी नियंत्रित राहते.
६.भरपूर आयर्न:
खजुरामध्ये भरपूर आयर्न असते. त्यामुळे ऍनिमिया झालेल्या लोकांना खजूर खाणे उत्तम आहेत. गर्भवती स्त्रियांनी खजूराचे सेवन केल्यास थकवा दूर होतो.