लंडन – गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये पृथ्वीचा स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरण्याचा म्हणजेच परिभ्रमणाचा वेग वाढला असून यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये शास्त्रज्ञांना परमाणू घड्याळांमध्ये बदल करावा लागण्याची शक्यता आहे.
पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती एका वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांमध्ये परिभ्रमण पूर्ण करते आता हा परिभ्रमणाचा वेग वाढला असल्याने कदाचित 365 पेक्षा कमी दिवसांमध्ये पृथ्वी सूर्याभोवतीचे अंतर पूर्ण करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
काही हजार वर्षापूर्वी ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 420 ते 425 दिवस लागत असत तेव्हा एक वर्ष 420 ते 425 दिवसाचे असे आता 365 किंवा 366 दिवस लागतात पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग वाढल्याने पुन्हा एकदा याबाबत काही ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. आगामी कालावधीमध्ये पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग आणखी वाढला तरच शास्त्रज्ञांना अशा प्रकारची ऍडजस्टमेंट करणार करावी लागणार आहे असे सांगण्यात येत आहे.
दिनदर्शिकेमध्ये ज्याप्रमाणे लिप इयरची ऍडजेस्टमेंट करण्यात येते त्याच प्रकारे पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग वाढल्यानंतर लीप सेकंद ची अडजस्टमेंट करावी लागते आणि परमाणु घड्याळामध्ये सेकंद ॲड करावे लागतात. सध्या एक दिवस 86 हजार 400 सेकंदांचा असतो पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या वेगामध्ये सुद्धा फरक पडतो तेव्हा या सेकंदांमध्ये ही फरक पडतो त्या कालावधीमध्ये सुद्धा परमाणु घड्याळामध्ये काही लीप सेकंद ॲड करावे लागतात.
पृथ्वीची स्वतः भोवती फिरण्याची गती वाढल्याने आपोआपच सूर्याभोवती फिरण्याची गतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच आगामी कालावधीमध्ये शास्त्रज्ञांना लीप सेकंडच्या ॲडजस्टमेंटचा विचार करावा लागणार आहे.