इस्लामाबाद – पाकिस्तानातील इस्लामाबाद, रावळपिंडी आणि आसपासच्या भागात शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाच्या भीतीने लोक कलमा-ए-तैयबाचे पठण करत असतानाच घराबाहेर पडले. भूकंपामुळे इस्लामाबाद किंवा रावळपिंडीमध्ये कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
गेल्या महिन्यात गिलगिटमध्ये ३.३ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. ऑक्टोबरमध्ये कराचीच्या विविध भागात ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटर इस्लामाबादच्या मते, धक्क्याचे केंद्र १५ किमी जमिनीखाली नोंदवण्यात आले, ज्याचा केंद्रबिंदू कायदाबाद, कराचीजवळ होता.