पालघरमध्ये पुन्हा 2.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

पालघर – पालघरमध्ये डहाणू, तलासरी भागात भूंकपाचे धक्के बसले आहेत. वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यानं गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसललंय. आज दुपारी 2.12 वाजता पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता 2.6 असल्याची नोंद रिक्टर स्केलवर झाली आहे.

दरम्यान, आज सकाळी सुध्दा 7.40, 7.44 आणि त्यानंतर 7.53 वाजता जोरदार आणि सौम्य भूकंपाचे धक्के बसले होते. हे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.