पिंपरी, दि. 17 -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडून 12 सुविधा क्षेत्राचे भूखंड 80 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्राधिकरणाकडून ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
ई-लिलाव प्रक्रियेद्वारे भाडेपट्ट्याने देण्यात येणा-या भूखंडांमध्ये मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथील 4, मानमधील 3, पिरंगुटमधील 2 भूगावमधील 2 व कासार अंबोलीमधील 1 असे एकूण 12 सुविधा भूखंड 12 एप्रिल रोजी होणाऱ्या ई-लिलावाद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक लिलावधारकांना शासनाच्या https://eauction.nic.in या संकेतस्थळावरून 20 मार्च ते 5 एप्रिल रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येणार आहे.
लिलावाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सर्व लिलाव प्रक्रियेची संपूर्ण माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (https://pmrda.gov.in) उपलब्ध आहे. संपूर्ण लिलाव प्रक्रिया https://eauction.nic.in या संकेतस्थळावरून होणार आहे. या सर्व भूखंडावर प्राधिकरणाच्या 2018 च्या मंजूर विकास नियमावलीनुसार विकास प्रयोजन व चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय होईल. त्यासाठी इच्छुक विकासकांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.
अ.क्र. सुविधा भूखंड तपशील, सुविधा क्षेत्राचे क्षेत्रफळ (चौ.मी.), ई-लिलावाची लघुतम किंमत
1) भूगाव ता. मुळशी स./गट नं. 257/1/1अ /2 1192.501,72,19,700
2) भूगाव ता. मुळशी स./गट नं. 14/15/अ/4/अ/ऍ.स्पेस 1372.501,98,18,900
3) हिंजवडी ता. मुळशी स./गट नं 242/1/अ/3 1056.711,48,36,208
4) हिंजवडी ता. मुळशी स./गट नं. 263/264/अ/7 1899.793,36,83,277
5) हिंजवडी ता. मुळशी स./गट नं .265/2/पै./266/1/ब/2 1978.053,15,49,898
6) हिंजवडी ता. मुळशी स./गट नं. 137/1/क/32007.91 2,81,91,056
7) कासार आंबोली ता. मुळशी स./गट नं 108/ब/3/ ऍ.स्पेस1186.580,44,470
8) माण ता. मुळशी स./गट नं. 29/31/32/43/अ/2 1003.631,14,31,346
9) माण ता. मुळशी स./गट नं. 279/1 5665.406,45,28,906
10) माण ता. मुळशी स./गट नं. 277/ब3/ ऍ.स्पेस8470.00 9,64,73,300
11) पिरंगुट ता. मुळशी स./गट नं. 28 3/ऍ.स्पेस 1128.62 88,93,526
12)पिरंगुट ता. मुळशी स./गट नं. 532/ऍ.स्पेस 2295.062,02,42,429