अकलूज – दत्तनगर-खंडाळी (ता. माळशिरस) येथील रशीद मौला शेख यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर व शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांच्यावतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत 65 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल छत्रपती संभाजीराजे ग्रुप दत्तनगर यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजयुमोचे तालुका सरचिटणीस विनोद थिटे, राष्ट्रवादीचे युवा नेते विक्रम मेथा, बाळू कांबळे, पैगंबर शेख, देवा कांबळे सोन्या सोनवणे, लखन आरडे, गोपाळ काळे, डॉ. धोत्रे, नाना वारुळे, दादा विटकर, महेश खिलारे, लाला शेख, धीरज शेख, कल्याण कांबळे, चांद शेख आदी उपस्थित होते.
या यशाबद्दल त्यांच्यावर दत्तनगर परिसरासह तालुक्यातील विविध मान्यवराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अल्ताफ शेख यांनी आभार मानले.