वाघोली, (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आयोजित अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 200 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात वाघोलीच्या एस डी बॉक्सिंग क्लबने 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदकासह घवघवीत यश मिळवले.
क्लबचा बॉक्सर विराट केतन जाधव यास सदर स्पर्धेत छोट्या गटात बेस्ट बॉक्सर म्हणून सन्मानित करण्यात आले. यात अनुक्रमे विराट केतन जाधव, साईराज अविनाश जाधव, पूर्वा योगेश सातव, आर्या शिवाजी सातव, विशाल दहीकर यांनी सुवर्णपदक मिळविले. श्रुतिका अमोल सातव, अनुश्री सुनील पाटील, राजवीर आदित्य गोते, चैताली मोहन एरंडे, मानस पाटील, शार्दूल कुर्हे यांनी सिल्वर मेडल मिळवले.
खेळाडूंना बळीराम जाधव आणि सूर्यकांत दूधभाते सर यांचे मार्गदर्शन लाभले. वाघोलीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील, भाजपाचे युवा नेते अनिल सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव, वाघोली शहर भाजपा अध्यक्ष केतन जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.