दुलीप करंडकासाठी गिल, पांचाल, फैजकडे नेतृत्व

नवी दिल्ली – भारतातील अ श्रेणीच्या क्रिकेट स्पर्धेतील सर्वात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेसाठी नुकतीच घोषणा करण्यात आली असून यासाठी निवडण्यात आलेल्या संघांमध्ये युवा खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले असून या संघांचे कर्णधारपदही युवा खेळाडूंकडेच सोपवण्यात आले आहे. ज्यात शुभमन गिल, प्रियांक पांचाल आणि फैज फझलयांचा समावेश आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना भारत “अ’ संघात स्थान मिळवण्याची संधी मिळते. स्थानिक व “अ’ संघात सलग चांगली कामगिरी करत असलेल्या युवा खेळाडूंना भारताच्या मुख्य संघाचा दरवाजा ठोठावण्याचा आणि आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न असेल.

गेल्या तीन सत्रापासून दिवस-रात्र फॉरमॅटमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला. पण, प्रसारणमध्ये कमतरतेमुळे लीग सामन्यांमध्ये लाल चेंडूचा वापर केला जाईल. अंतिम सामना दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जाणार आहे व त्याचे थेट प्रक्षेपण देखील होईल. भारत “अ’ संघासाठी चांगली कामगिरी करून देखील 19 वर्षीय गिलला संधी मिळाली आही.

इंडिया ब्लूमध्ये गिल शिवाय ऋतुराज गायकवाडचाही समावेश आहे. संघात अंकित बावणे, जलज सक्‍सेना, कर्नाटकचा गोपाल व केरळचा जलदगती गोलंदाज बासिल थंपीचा समावेश आहे. पांचालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात वरुण एरॉनचा देखील समावेश आहे. इंडिया ग्रीनचे नेतृत्व विदर्भचा रणजी विजेता कर्णधार फैज फझलकडे असेल. वेस्ट इंडिज दौर्यात टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा राहुल चहर देखील या संघाचा भाग आहे.

दुलीप ट्रॉफीत खेळणारे तिन्ही संघ

इंडिया ब्ल्यू : शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, अनमोलप्रीत सिंह, रिकी भुई, अंकित बावणे, स्नेल पटेल (यष्टिरक्षक), श्रेयस गोपाल, सौरभ कुमार, जलज सक्‍सेना, तुषार देशपांडे, बासिल थम्पी, दिवेश पठानिया, अनिकेत चौधरी, आशुतोष ए.

इंडिया ग्रीन : फैज फजल (कर्णधार), अक्षत रेड्डी, ध्रुव शोरे, प्रियम गर्ग, सिद्धेश लाड, अक्षदीप नाथ, राहुल चाहर, धर्मेंद्र जडेजा, जयंत यादव, अंकित राजपूत, इशान पोरेल, तनवीर उल हक, अक्षय वाडकर (यष्टिरक्षक), राजेश मोहंती, मिलिंद कुमार.

इंडिया रेड : प्रियांक पांचाल (कर्णधार), अभिमन्यू ईश्‍वरन, अक्षर पटेल, करुण नायर, इशान किशन (यष्टिरक्षक), हरप्रीत भाटिया, आदित्य सरवटे, महिपाल लोमरोर, अक्षय वखारे, वरुण एरॉन, रोनित मोरे, जयदेव उनाडकट, संदीप वॉरियर, अंकित कलसी.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×