car catches fire on sinhgad – सिंहगडावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाच्या चारचाकी खासगी वाहनाने पेट घेतला आहे. या आगीमध्ये हे चारचाकी वाहन जाळून खाक झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी परिसरातील नागरिक सिंहगडावर पर्यटनासाठी गर्दी करत असतात. आज रविवार असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांनी गर्दी केली होती. अशातच सायंकाळी ५ च्या दरम्यान अचानक या चारचाकी वाहनाने पेट घेतल्याने मोठा गोंधळ उडाला.
गाडीला लागलेली आग आटोक्यात न आल्याने ही चारचाकी गाडी जाळून खाक झाली आहे. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी गाडीला लागलेल्या आगीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले असून याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अग्निशमन दलाला याबाबतची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी दलाचे एक वाहन घटनस्थळी झखल झाले आहे.
सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर पर्यटकांची गर्दी
शनिवार, रविवार व इतर सुट्ट्यांच्या दिवशी पुणे व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सिंहगडावर गर्दी करत असतात. यामुळे गडावर जाण्यासाठी बरेचदा वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या असतात. अशात अचानक गाडीने पेट घेण्याची घटना घडल्याने दोन्ही बाजूचे वाहतूक थांबवण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.