म्हशीच्या “त्या” एक चुकीमुळे मालकाला लागला तब्बल एवढ्या रकमेचा चुना

नवी दिल्ली –  मध्‍य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये  म्हशीच्या चुकीमुळे मालकाला १० हजार रुपये दंड ठोठावल्याची घटना  समोर अली आहे.  या मालकाचे नाव  बेताल सिंग असून ग्वालियर महानगरपालिकेकडून हा दंड ठोठावण्याचा आदेश दिला.

याबाबत संपूर्ण वृत्त असे की,’ ग्वालियर महानगरपालिकेकडून एका नवीन रस्त्याचं काम सुरू  होते.  या नवीन रस्त्यावर  बेताल सिंग यांच्या एक म्हशीकडून रस्त्यावर शेण टाकल्यामुळे  तेथील महापालिकेच्या आयुक्तांनी  हा दंड ठोठावला आहे.   

याबाबत महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितले की, रस्त्यावर  पाळीव प्राण्यांनी  घाण केल्यास मालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.  मात्र या असं असतांनाही बेताल सिंगच्या म्हशी रस्त्यावर फिरत होत्या. सांगूनही त्याने म्हशींना हटवलं नाही.  यामुळे  आम्हाला बेताल सिंगविरोधात कारवाई करत १० हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.