नव्या करोना स्ट्रेनचा धोका वाढला; केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल

नवी दिल्ली – जगभरातील देश करोना विषाणूशी लढत असताना आता ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असून भारतातही याचे काही रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

अलर्ट! भारतामध्ये वेगाने पसरतोय करोनाचा नवा स्ट्रेन

हरदीपसिंह पुरी म्हणाले कि, ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने निर्णय घेतला आहे की 7 जानेवारी 2021 रोजी रात्री 11:59 पर्यंत ब्रिटनहून भारतात येणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली जातील.

22 डिसेंबरपासून ब्रिटनहून भारतात येणारी विमाने 7 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली.

दरम्यान, ब्रिटनमध्ये तयार झालेल्या करोनाच्या नव्या विषाणूचा आता भारतातही झपाट्याने पसरत आहे. करोनाचा नव्या विषाणूचा वेगाने संक्रमण होत आहे. आतापर्यंत ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये  करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहेत.

टेन्शन वाढलं; ब्रिटनहून आलेले 300 प्रवासी ‘नॉट रिचेबल’

करोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे आहेत भयानक ; वाचा सविस्तर…

ब्रिटनवरून आलेल्या “पॉझिटिव्ह’ रुग्णांचे जिनॉम सिक्‍वेन्स तपासणार

जगाची चिंता वाढली ; करोनाचा नवा स्ट्रेन १६ देशांमध्ये पोहोचला

धक्कादायक! २ वर्षांच्या चिमुकलीला करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.