मंचर – लॉकडाऊनमुळे व पुणे रेडझोनमध्ये असल्याने आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा तरकारी माल बाजारपेठेत विक्रीसाठी जात नाही. पर्यायाने बाजारभाव कोसळले असल्याने शेतकरी कोबी पिकाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करीत आहेत.
नांदूर (ता. आंबेगाव) येथील शेतकरी बाजीराव बाबूराव भालेराव यांनी एक एकर क्षेत्रामध्ये कोबी पिकाची लागवड केली होती. त्याकरिता त्यांनी रोप खरेदी, औषध फवारणी आणि खते यासाठी एकून 50 हजार रुपये खर्च केला होता.
मात्र, सध्या शेतमालाची खरेदी-विक्री बंद असल्यामुळे कोबी पीक शेतात सोडून देण्यापेक्षा सामाजिक बांधीलकी जपत त्यांनी शेतकऱ्यांना मोफत चारा म्हणून जनावरांसाठी कोबी पीक ट्रॅक्टर टॉलीमध्ये स्वतः काढून भरून दिले.