नगर | दूध संघात साडेआठ कोटींचा गैरव्यवहार

तत्कालीन संचालकांविरुद्ध गुन्हा; शासनाचा कर चुकविण्यासाठी खोट्या नोंदी केल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी) – नगर तालुका दूध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाने शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने खोटे लेखे तयार करून दस्तऐवजात खोट्या नोंदी केल्या. कर्मचार्‍यांच्या देय असलेल्या रक्कमा हिशोबातून काढून टाकत 8 कोटी 52 लाख 68 हजार 28 रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून वीस जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोरख पाराजी पालवे, अध्यक्ष उद्धव रावसाहेब अमृते, किसन बाबूराव बेरड, उपाध्यक्ष मोहन संतुजी तवले, कार्यकारी संचालक कैलास अंजाबापू मते, अनिल मार्डिकर अ‍ॅण्ड कंपनीचे पार्टनर – सनदी लेखापाल सागर शेषराव साबळे, भाऊसाहेब गंगाराम काळे, रामदास शंकर शेळके, बजरंग किसन पाडळकर, सुभाष गंगाधर लांडगे, अर्जुन सर्जराव गुंड, राजाराम चंद्रभान धामने, मधुकर किसन मगर, भिमराज रामभाऊ लांडगे, गोरख रामभाऊ काळे, स्वप्निल बाबासाहेब बुलाखे, वैशाली आदिनाथ मते, पुष्पा शरद कोठुळे, गुलाब केरुजी कार्ले, गुलाब मारुती काळे यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे.

याबाबत सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक नारायण धुरपतराव गाधेकर (वय-54 रा. भुतकरवाडी, सावेडी, नगर) यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम- 1960 चे कलम 146 अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादीत म्हटले, की  मार्च 2019 ते मार्च 2020 या काळात नगर तालुका दूध संघात असलेल्या संचालक मंडळाने संगमताने खोटे लेखे तयार केले. दस्तऐवजावर खोट्या नोंदी केल्या. 

शासनाचा कर चुकविण्याच्या हेतूने नियोजन करीत फसवणुकीचा कट केला. कर्मचारी, प्रशासक व अवसायक यांच्या देय असलेल्या रक्कमा हिशोबातून  काढून करून गैरव्यवहार केला.व्यवहार करण्यासाठी अधिनस्त असलेल्या कर्मचार्‍यांना अपप्रेरित केले. कर्मचार्‍यांच्या रक्कमा अदा करताना जाणीवपूर्वक भेदभाव करून संशयित व्यवहार केला. संघाच्या पदाधिकार्‍यांनी चेअरमन असलेल्या संस्थाच्या नावाने संघातून अ‍ॅडव्हान्सच्या नावाखाली निधीचा गैरव्यवहार केला. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.