देवदत्त पड्डीकल करोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – आयपीएल-2021चे पर्व तोंडावर आले असून करोनाच्या सावटाखाली बंद दाराआड आयपीएलचे सर्व सामने खेळवले जाणार आहेत. मात्र हंगामाची सुरुवात होण्यापूर्वीच मैदानावर कोविड-19 चे आगमन झाले आहे.

नुकताच बंगळुरू संघाचा युवा शिलेदार देवदत्त पड्डीकल करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. करोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर पड्डीकलला संघातील सर्व खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. पड्डीकल बंगळुरू संघाचा सलामीवीर फलंदाज आहे.

दरम्यान, स्टार फिरकी गोलंदाज अक्‍सर पटेल याला करोनाची बाधा झाल्याचे शनिवारी समोर आले आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या नितिश राणा याचाही करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.