नाटक शाळा एक अभिनव उपक्रम

सुबोध भावे ः दोन दिवसीय नाट्य प्रशिक्षण

नगर -नाटक शाळा ही एक वेगळी संकल्पना असून याद्वारे अनेक कलाकारांना ,नाट्यक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना किंवा कलाक्षेत्रात धडपड करू पाहणाऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याच व्यासपीठ असेल,तसेच हा एक अभिनव उपक्रम आहे. असे मत संचालक सुबोध भावे यांनी व्यक्त केले.नाटक शाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

नाटकशाळेच्या वतीने आयोजित हे दोन दिवसांचं नाट्य प्रशिक्षण शिबिर करून आपल्याला सगळच नाटक येईल असेल असं नाही तर या प्रोसेसमध्ये आपण कसं पुढे गेलं पाहिजे या हेही महत्त्वाचा आहे असेही ते म्हणाले. नाटक शाळेच्या वतीने अशी नाट्य शिबिरे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावात सुद्धा घेण्यात येतील हेही त्यांनी या वेळेला सांगितलं या उद्‌घाटन प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी नेपथ्यकार राजन भिसे आणि लेखक गिरीश जोशी यांच्यासह छायाताई फिरोदिया गौरव फिरोदिया ,कल्याणी फिरोदिया आणि प्रसाद बेडेकर उपस्थित होते.

अहमदनगर मध्ये प्रथमच अशा दिग्गज मंडळींचा दोन दिवसांचे नाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे यामागचा उद्देश म्हणजे यानिमित्ताने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांना योग्य मार्गदर्शन मिळावे त्यांना त्यांच्या वाटा समजाव्यात त्याचबरोबरीने एक रीतसर मार्गदर्शन मिळण्याची सुरुवात व्हावी अहमदनगर सारख्या छोट्या गावातील कलाकारांना सुद्धा तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळावे म्हणून नाटक शाळेने हा उपक्रम सुरू केला आहे अशी माहिती नाटकशाळेच्या संस्थापिका कल्याणी फिरोदिया यांनी दिली.

या नाटक शाळेसाठी महाराष्ट्रभरातून पस्तीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला नागपूर वर्धा ते अगदी सांगली सातारा पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या नाट्य शिबिरासाठी आपली नाव नोंदणी केली असल्याची माहिती नाटक शाळेचे प्रसाद बेडेकर यांनी दिली.

दोन दिवसीय नाट्य शिबिरामध्ये अभिनय लेखन दिग्दर्शन कलादिग्दर्शन यासह नाटकांच्या विविध बाजूंचे प्राथमिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे आणि प्रतिमा कुलकर्णी यांनी दिली तसेच लेखनातल्या काही गोष्टी जस की लेखन नेमकं कसं केलं जातं त्याची प्रोसेस काय असते? या बरोबरच एकूण सादरीकरण करताना कलादिग्दर्शनाच महत्त्व काय असतं? दिग्दर्शक नेमकं काय करतो? अभिनेत्याचे काम काय असतं? या सारख्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यात करण्यात येणार असल्याची माहिती गिरीश जोशी आणि राजन भिसे यांनी दिली.

या कार्यक्रम प्रसंगी उर्जा गुरुकुल शाळेत उभारण्यात आलेल्या नूतन सभागृहाचे उदघाटन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नाटक शाळेच्या लोगो चे अधिकृतरित्या अनावरण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.