नगर -जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सर्प निघाल्याची घटना समोर आली आहे. हा सर्प अतिदक्षता विभागात झोपलेल्या रुग्णालयाच्या नातेवाइकाच्या शर्टमध्ये जाऊन बसला होता. सर्प बिनविषारी असल्याने मोठा अनर्थ टळला.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रुग्णाच्या शेजारी फरशीवर झोपलेल्या नातेवाइकाच्या शर्टमध्ये हा सर्प जावून बसला होता. ही व्यक्ती एका कुशीवर झोपलेली असल्याने मोठा अर्नथ टळला. सर्पमित्राने हा सर्प व्यक्तीच्या शर्टमधून काढल्यानंतर हा सर्प बिनविषारी असल्याचे सांगितले.
या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सर्प असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग हा तळमजल्यावर आहे. परिसरात अस्वच्छता असल्याने हा सर्प आला असल्याचे बोलले जात आहे.