मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील, देवीसिंह शेखावत, प्रतिभाताई पवार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिवलिंगाचे जलाभिषेक करून दर्शन घेतले.
गेल्या 37 वर्षांपासून श्रावण महिन्यात दर्शनासाठी प्रतिभाताई पवार आपल्या मैत्रिणींसमावेत येथे येत असतात. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे त्या आल्या नव्हत्या. यावर्षी त्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यांच्यासमावेत किरणताई वळसे पाटील, उज्ज्वला शिंदे, मणियार भाभी यांनीही दर्शन घेतले आहे.
देवस्थानच्या विश्वस्थांच्या वतीने सर्वांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे.यावेळी आदिवासी नेते सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, भीमाशंकर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, उपविभागिय अधिकारी सांरग कोडलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, भीमाशंकर सरपंच दत्तात्र हिले उपस्थित होते.