राज ठाकरेंनी केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 व्या महापरिनिर्वाणदिन असून त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील त्यांचे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येते आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले. राज ठाकरेंनी बाबासाहेबांना अभिवादन करताना आपल्या धिकृत ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल”. असं राज ठाकरेंनी म्हंटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.